ग्राममंगल, स्नेहनगरीत ‘यश आयुर्वेद धर्मार्थ दवाखान्या’चे उत्साहात उद्घाटन
१५ ऑगस्ट २०२६

अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान आणि ग्राममंगल यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्राममंगलच्या सहकार्याने १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्नेहनगरी (ग्राममंगल), ऐना, पालघर येथे ‘यश आयुर्वेद धर्मार्थ दवाखान्या’चे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत क्षेत्रांत ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासाठी ही संकल्पना अनंत आयुर्वेद प्रतिष्ठानच्या सचिव वैद्य मेघना बाक्रे आणि कार्याध्यक्ष वैद्य सुलक्षणा बनसोडे यांनी मांडून ग्राममंगलच्या मदतीने प्रत्यक्ष कृतीत आणली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैद्य मेघना बाक्रे यांनी केले.
उद्घाटक: डॉ. अनिल काकोडकर (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व अध्यक्ष, ग्राममंगल) आणि श्री. रमेश पानसे (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व संस्थापक-विश्वस्त, ग्राममंगल).
प्रमुख पाहुणे: श्री. प्रकाश पारखी (प्रमुख, नाट्यसंस्कार कला अकादमी) आणि वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर (ज्येष्ठ आयुर्वेद चिकित्सक).

कार्यक्रमाचे प्रमुख मुद्दे व मान्यवरांचे विचार:
डॉ. अनिल काकोडकर यांनी वेद व सुश्रुत संहितेचा संदर्भ देत आयुर्वेदाची प्राचीनता अधोरेखित करून प्रकल्पास शुभेच्छा दिल्या.
वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी आयुर्वेदातील अत्यायिक चिकित्सेचे महत्त्व विशद करून उद्घाटनानंतर प्रत्यक्ष रुग्णतपासणी केली.
प्रास्ताविक श्री. अचिंत्य बाक्रे यांनी केले, तर ग्रामीण प्रकल्पाची उद्दिष्टे वैद्य सुलक्षणा बनसोडे यांनी मांडली.
उपचाराने बरे झालेले रुग्ण श्री. माधव काका आणि योगदानकर्ते श्री. चंद्रशेखर महंते व रणकोळचे ग्रामपंचायत सदस्य श्री. सिक्कीन यांनी मनोगत व्यक्त केले.
वैद्य दिगंबर निर्मले, सोलापूर यांनी दवाखान्यासाठी स्वेदनपेटीची व्यवस्था करून दिली.
मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व शालेय विद्यार्थ्यांची शारीरिक-मानसिक आरोग्य तपासणी.
इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेद परिचय.
अभ्यंग व दाई प्रशिक्षण कार्यशाळा.
इतर उपक्रम – औषधी वनस्पती लागवड, मधमाशीपालन, गोसंवर्धन आणि नैसर्गिक शेती प्रसार.
संपर्क
वैद्य मेघना बाक्रे – 98508 15375
वैद्य सुलक्षणा बनसोडे – 94235 85560







आमचे काही वैशिष्ठ्य पूर्ण उपक्रम

आमचे सहकारी वैद्य आणि वैदयेतर मंडळी

आमच्या दवाखान्याची उभारणी

आम्ही चिकित्सा देऊन उपशय प्राप्त झालेले रुग्ण

आपण या कार्यात आम्हास सहकार्य करू शकता
- त्यासाठी Google Form भरावा
आपण देणगी देऊन कार्यात सहभागी होऊ शकता
- email: anantayurveda@gmail.com