Category: आरोग्य शिक्षण

To increase awareness of Ayurveda in primary school. The contents useful for Teachers. Teachers to understand Ayurveda. We regularly conduct webinars fro the students and teachers. Our posts Arogya Shikshan is part of this efforts.

आरोग्य शिक्षण भाग १

आरोग्य शिक्षण भाग १

आहारातील रस जाणून घेऊयात !!

आपण जेव्हा एखाद्या पदार्थाची चव घेतो तेव्हा तो पदार्थ केवळ गोड वा केवळ तिखट असा नसतो. एखादा पदार्थ एक रसाने बनला आहे असे आपल्याला वाटत असले तरी त्यात इतर चवी असतात. जसे आवळा हा आंबट असला तरी त्यात गोड, तुरट, या चवीही कळतात.

आहारातील वेगवेगळ्या चवींमुळे आपल्या आहाराला एक लज्जत येते. तसेच या सर्व चवी आपल्याला आहारात असणे अतिशय आवश्यक असते. त्यांचे प्रत्येकांचे वेगवेगळे कार्य शरीरात होत असते.

  • मधूर म्हणजे गोड रसाचे पदार्थ हे शरीरात बल वाढवतात.
  • अम्ल म्हणजे आंबट रसाचे पदार्थ काही प्रमाणात पाचन करतात.
  • तिक्त, कटू आणि लवण रस पचनासाठी मदत करतात.
  • कषाय म्हणजे तुरट रस बांधून ठेवण्याचे काम करतो.  

काही पदार्थ २-३ रसानी एकत्र येऊन काम करतात जसे लिंबू, साखर, मीठ घातलेले पाणी हे गोड, आंबट आणि खारट रसामुळे तृप्ति करते, आल्हाद उत्पन्न करते त्याने मनाचे समाधान होते.

अशाप्रकारे प्रत्येक रसाचे आपले स्वतंत्र काम काही असते तसेच काही रस एकमेकांबरोबर विशिष्ट काम करतात.

आहारातील या छोट्या छोट्या गमती जमती जर आपण मुलांना सांगू शकलो तर मुलांनाही ते पदार्थ खायला मज्जा येईल. तसेच त्या पदार्थाचे महत्वही त्यांना कळेल.


आधुनिक शास्त्रानुसार केवळ ४ रस आहेत.

  • मधूर (sweet)
  • अम्ल (sour)
  • लवण (salty)
  • तिक्त (bitter)

आपल्याला ६ रसांचे ज्ञान फार पूर्वीपासूनच आहे

  • मधूर – Sweet- गोड
  • अम्ल – Sour-आंबट
  • लवण – Salty-खारट
  • कटू– Pungent-तिखट
  • तिक्त – Bitter-कडू
  • कषाय – Astringent-तुरट

रस शब्द पर्याय –

Juices
  • रस – द्रव पदार्थ – juice, फळे अथवा भाज्यांचा रस
  • रस – आहाररस
  • रस – पारा
  • रस – षड्रस – ६ रस – मधूर, अम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय

आयुर्वेदशास्त्रानुसार हे सर्व रस हे पंचमहाभूतांच्या कमी अधिक प्रमाणामुळे निर्माण होतात असे मानले आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार सर्वच पदार्थ हे ५ महाभूतांनी बनलेले आहेत. म्हणजेच त्यांचे संघटन हे ५ महाभूतांनी असते. पृथ्वी, जल, वायु, अग्नि आणि आकाश. रसही पांचभौतिक आहे.

त्यांचे पांचभौतिक संघटन असे आहे

  • मधूर – पृथ्वी + जल
  • अम्ल – पृथ्वी + अग्नि
  • लवण – जल + अग्नि
  • कटू – आकाश + वायु
  • तिक्त – अग्नि + वायु
  • कषाय – पृथ्वी + आकाश

ह्या प्रत्येक पंचमहाभूतांचेच विविध परिणाम रसांद्वारे शरीरात होत असतात. त्याबद्दल आपण पुढे विचार करुयात.


हे रस विविध वयाच्या मुलांना शिकवण्यासाठी काय करता येईल?

वयोगट

१ ते ६ वर्ष

प्रयोग

सर्व प्रकारच्या रसांचे पदार्थ मुलांना खाण्यास देताना त्याचे महत्व सांगावे.
उदा. पोळी, भात हे गोड पदार्थात मोडतात. त्याने शरीरात शक्ति वाढते.
रस ओळख – वेगवेगळ्या रसांची मुलांना ओळख करून द्यावी.
त्यासाठी त्या त्या रसांचे आधिक्य असलेले पदार्थ निवडावेत.
उदा. लवण – मीठ, अम्ल रस – लिंबू इ.

कोणी शिकवावे ?

आई – वडील

रस ज्ञान वाढते.
Taste-bud development

वयोगट

६ ते ८ वर्ष

प्रयोग

विविध रसांच्या पदार्थांची ओळख ,
त्यांची यादी करणे,
त्यांचे प्रत्यक्ष रसज्ञान करणे,
त्यांचे विविध गटात वर्गीकरण करणे.

कोणी शिकवावे?

पालक – शिक्षक

रस ओळख.
पुढे वेगवेगळे पदार्थ कसे निर्माण होतात हे समजते.

वयोगट

९ ते १२ वर्ष

प्रयोग

रसांचे पांचभौतिक संघटन तपासणे.
त्यांचे पांचभौतिक संघटनानुसार वर्गवारी करणे.
दिवसभरात खालेल्या पदार्थाने शरीरावर होणारे परिणाम तपासणे

कोणी शिकवावे?

पालक – शिक्षक

पदार्थांची ओळख होते

वयोगट

१३ ते १६ वर्ष

प्रयोग

रसांच्या पूर्वीच्या ज्ञानावर संशोधन करणे. जसे,
कोणत्या रसांचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात?
कोणत्या रसांचे पदार्थ जास्त खाले गेले तर त्रास होऊ शकतो?
कोण कोणत्या पदार्थांमध्ये कोण कोणते रस आहेत?
पांचभौतिक संघटनानुसार कोणत्या पदार्थाने कोणत्या अवयवाची वाढ होते?

कोणी शिकवावे?

शिक्षक

रसांचे अधिक्याने तसेच सर्वांगाने ज्ञान होण्यासाठी

लहान मुलांना हे ज्ञान कसे करून देता येईल याच्या विषयी अधिक माहिती आवश्यक वाटल्यास ईमेल जरूर करावा.